धुळे तालुक्यातील नगाव येथील २४ वर्षीय शेतकरी भुमेश विलास पाटील याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. २३ ऑगस्ट रोजी शेतात कीटकनाशक फवारणीसाठी गेलेल्या भुमेशची प्रकृती बिघडली होती. त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, मात्र चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर २७ ऑगस्ट रोजी दुपारी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद असून पुढील तपास सुरू आहे.