नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील धवळीविहीर ग्रामपंचायत अंतर्गत रोझवा प्लॉट येथे पूल नसल्याने वाहत्या पाण्यातून मृतदेह नेण्याची ग्रामस्थांवर वेळ आली आहे. हा धक्कादायक प्रकार आज सकाळी समोर आला आहे. वारंवार मागणी करून देखील पूल उभारला नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.