कलमठ ग्रामपंचायत वतीने गणेशोत्सवाच्या काळातील गणेशाचे निर्माल्य घरोघरी संकलन करण्यासाठी निर्माल्य कलश रथ तयार करून घरोघरी जात निर्माल्य संकलन केले. भव्य कलश, सजलवेला रथ घेऊन ग्रामपंचायत कलमठ गावात फिरला.कलमठ ग्रामपंचायतच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाला ग्रामस्थानी प्रतिसाद देत कौतुक केले. अशी माहिती सरपंच संदिप मेस्त्री यांनी शनिवार 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता दिली.