शिरूर तालुक्यातील इनामगाव परिसरातील दर्यापट वस्तीवर शुक्रवारी (ता. 22) पहाटे दीडच्या सुमारास चार जणांच्या टोळक्याने दरोडा घालून 90 वर्षीय जेष्ठ महिलेला धारदार शस्त्राने मारहाण केली.यात ज्येष्ठ महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.