प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा ईद मिलाद उन नबीचा सण धुळे शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या मंगल दिनाचे औचित्य साधून शहरातील दाऊदी बोहरा समाज बांधवांच्या अंजुमन-ए-सैफी जमातीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही एका भव्य आणि शिस्तबद्ध मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश देणे, हा या मिरवणुकीचा मुख्य उद्देश होता.