श्रावण महिना संपल्यानंतर येणाऱ्या ऋषिपंचमीला शेगावीचे संत श्री गजानन महाराज यांची पुण्यतिथी असते याच अनुषंगाने वाशिम तालुक्यातील गजानन महाराज यांच्या भक्तांची दिंडी दिनांक 24 ऑगस्ट रोजी शेगाव कडे रवाना झाली. या दिंडीमध्ये महिला पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, सदर दिंडी वाशिम मालेगाव पातुर बाळापूर मार्गे गुरुवारी कृषी पंचमीच्या दिवशी शेगाव येथे पोहोचणार आहे.