नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार यांनी नुकताच सुरू केलेला आदी कर्मयोगी या अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या हस्ते करण्यात आले. अभियानात सहाय्यक प्रकल्प अधिकारी देवेंद्र वाणी यांनी माहिती दिली तर प्रकल्प समन्वयक अमोल राठोड यांनी मार्गदर्शन केले.