एकनाथ शिंदे यांच्यामुळे महायुती मजबूत झाली पुन्हा सत्तेत आले शिवसेनेचे पदाधिकारी भारतीय जनता पक्षात घेणे म्हणजे महायुतीत मिठाचा खडा टाकण्यासारखे आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबाबत काळजी घ्यायला हवी होती, मात्र तसे झाले नाही. आता भाजपमधील असंतुष्ट पदाधिकारी आमच्याकडे घेण्यासंदर्भात देखील मार्ग मोकळा झाला असून त्यांची काळजी देखील आम्ही घेऊ असे वक्तव्य शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशावर केले आहे.