आर्णी शहरात आज दिनांक 6 सप्टेंबर ला सकाळी 11 वाजता पासून शहरातील अरुणावती नदीवर बाप्पाचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषाने आर्णी दुमदुमली यासह ढोलताशाच्या गजरात आर्णी वासियांनी बाप्पाला निरोप दिला यावेळी मुसळधार पावसामुळे अरुणावती नदी दुधडी भरून वाहत होती अश्यात सुरकेशच्या दृष्टीने प्रशासनाने आवश्यक त्या उपाय योजना केल्या होत्या दुधडी भरून वाहणाऱ्या नदीत बाप्पाला विसर्जन देताना मनमोहन दृश्य पाहायला मिळत होते