बुलढाणा तालुक्यातील सैलानी येथे 22 ऑगस्टच्या रात्री शेख नफिस शेख हफीज उर्फ बाब्या वय 38 वर्ष रा.इंदिरा नगर,बुलढाणा याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.या प्रकरणी अटक तिन्ही आरोपींची पोलीस कोठडी संपल्यावर आरोपींना पुन्हा कोर्टा समोर हजर केले असता न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी बुलढाणा येथील जिल्हा कारागृहात करण्यात आल्याची माहिती रायपूर पोलिसांनी दिली आहे.