कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने तक्रारदार कामगारांना इंग्रजी भाषेत पत्रव्यवहार केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र आक्षेप घेतला आहे. शासन निर्णयानुसार सर्व शासकीय पत्रव्यवहार मराठी भाषेत करण्याची मागणी करत मनसेच्या जळगाव शहर पदाधिकाऱ्यांनी सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता सहायक भविष्य निर्वाह निधी आयुक्तांना लेखी निवेदन सादर केले.