यवतमाळ शहरातील ज्योतीराव फुले समाजकार्य महाविद्याल पिंपळगाव येथे राहणारे किशोर सुगदे यांच्या घरात दोघांनी प्रवेश करून एकूण 80 हजार 450 रुपयाच्या मुद्दमाल चोरून नेऊन जीवाने मारण्याची धमकी दिल्याची घटना दिनांक 9 ऑगस्ट रोजी घडली आहे. सदर घटने संदर्भात 20 ऑगस्ट रोजी लोहारा पोलीस ठाण्यामध्ये दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास लोहारा पोलिसांमार्फत सुरू आहे.