प्रत्येक मित्र पक्षाच्या नेत्याला मानसन्मान देण्याची उपमुख्यमंत्री शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे शिकवण आहे. मान सन्मान देतो म्हणजे आमची बोलायची ताकद नाही असे कोणी समजत असेल तर ते चुकीचे आहे, आम्ही देखील बोलू शकतो. यापुढे विरोधातला अथवा मित्र पक्षातील कोणीही एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोलला तर तेवढ्याच ताकदीने तोंड देऊन उत्तर द्या असे वक्तव्य पदाधिकाऱ्यांना संबोधताना मनोर राज्याचे उद्योगमंत्री शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी केले आहे.