"जिल्ह्यातील हजारो जेष्ठ साहित्यीक व कलावंतांचे मानधन चार वर्षांपासून रखडलेले असून,तातडीने मंजूरीसाठी अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात साखळी निवेदन अभियान सुरु केले आहे.आज झरी जामणी तालुक्यातील कलावंतांनी निवेदन सादर करून आपला आवाज बुलंद केला.