पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा उल्लेख करून काँग्रेसकडून प्रसारित करण्यात आलेल्या एआय व्हिडिओविरोधात आज 12 सप्टेंबर रोजी गोंदिया येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील सारस चौक येथे हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व आमदार चित्रा वाघ यांनी केले.यावेळी आमदार विनोद अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले, आमदार संजय पुराम, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर सिता रंहागडाले आदी उपस्थित होते.