उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असताना देखील आई-वडिलांनी लग्नाचा तगादा लावल्याने बारावी उत्तीर्ण झालेली मुलगी घर सोडून पळून गेल्याची घटना घडली आहे. ही घटना कुंजीरवाडी परिसरात 15 ऑगस्टला घडली असून सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. मात्र, लोणी काळभोर पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास करून मुलीचा शोध घेऊन तिच्या नातेवाईकांकडे सुखरूप सुपूर्त केले आहे.