ग्रा.पं.शितलवाडी अंतर्गत येणाऱ्या रामटेक मनसर मार्गावर बेवारस पशुंचा जमावडा तर असतोच परंतु आता शीतलवाडी टी पॉइंट ते मौदा रस्त्यावरील किट्स महाविद्यालय रामटेक या राज्य महामार्गावर सकाळपासूनच रात्रीपर्यंत बेवारस पशुंचा जमावडा दिसतो. शनिवार दि. 30 जानेवारीला दु. एक वाजता च्या दरम्यान या मार्गाच्या टी पॉईंटच्या थोड्या पुढे अगदी मध्यभागी बेवारस पशुंचा मोठा जमावडा बघावयास मिळाला. यामुळे आवागमन करणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला. ग्रा.पं. प्रशासनाने ही समस्या त्वरीत सोडवावी.