महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या राज्य उपाध्यक्षपदी जालना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांची निवड झाली असून जिल्ह्यातील राजपत्रित अधिकारी यांच्या वतीने त्यांचे शुक्रवार दि. 29 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 4.30 वाजता स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या सन 2025 ते 28 कालावधीसाठी राज्यस्तरीय पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये राज्याध्यक्षपदी नितीन काळे यांची तर उपाध्यक्षपदी शिरीष बनसोडे यांची निवड केली.