रेल्वे स्टेशन परिसरातील ओव्हरब्रिजखाली पार्सल ऑफिससमोर 22 ऑगस्ट रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. मृत इसमाचे वय अंदाजे 40 वर्ष असून त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत रेल्वे स्टेशन व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार सफाई कामगाराने मृतदेह पाहून पोलिसांना कळविले. यावरून गोंदिया शहर पोलीस ठाण्यात सकाळी 2.38 वाजता अकस्मात मृत्यूची नोंद (मर्ग) करण्यात आली असून पुढील चौकशी पो.नि. किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.वा. बिसेन करी