२३ ऑगस्ट रोजी दुपारी कोराडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली. रेहान अशफाक शेख वय १९, या तरुणाने आपल्या कारने पोलिस कर्मचारी सुधाकर पटमाशे यांना चिरडले. या हल्ल्यात सुधाकर यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने मानकापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.सीताबर्डी परिसरात राहणाऱ्या रेहानला घटनेनंतर पोलिसांनी शोधून काढले आणि त्याला अटक करण्यात आली आहे व कार देखील जप्त करण्यात आली आहे