कॅम्प चेरी फॉर्म रामटेक येथे रविवार दिनांक 21 सप्टेंबरला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान भव्य इंडियन बाईक विकचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष कार्यक्रमात तब्बल 400 रायडर्सनी राईडमध्ये सहभाग नोंदविला. रायडर्स यांनी नागपूर शहरातून उत्साह पूर्वक सुरुवात करून ते चेरी फॉर्म रामटेक येथे पोहोचले. राज्यमंत्री एड. आशिष जयस्वाल यांनी कार्यक्रमाला भेट देऊन रायडर्सला संबोधित केले. व दरवर्षी हा इव्हेंट साजरा करावा असे आवाहन केले.