वर्षभर अर्थसहाय्य ठप्प असल्याने "दिव्यांगांनी माती-गोटे खाऊन जगायचं का?" असा संतप्त सवाल उपस्थित करून गुरुदेव युवा संघाने नगरपरिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले. अखेर या लढ्याला यश मिळाले असून नगरपरिषदेकडून ३४ लाखांचा निधीचा चेक दिव्यांगांसमोर दाखवण्यात आला आहे.