कबूतरांसाठी लोक हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरतात, तेच कुत्र्यांसाठीही होतं आणि हत्तीणीसाठी लोक रस्त्यावर उतरून लढा देतात. ही चांगली गोष्ट आहेच,माणूसकी पाहिजे, भूतदया पाहिजे. पण मग पहलगाममध्ये जेव्हा आपल्याच देशाचे निष्पाप नागरिक मारले गेले, जे सैनिक शहीद झाले, ज्या माता-भगिनींचं कूंकू पुसलं गेलं, तेव्हा ही भूतदया,हीच माणूसकी कुठे गेली