नवनिर्माण गणेश उत्सव मंडळ अकोला नाका येथे कलापथक व वासूदेवाच्या माध्यमातून दि. 05 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान विविध सामाजीक व शासकीय उपक्रम व योजनांची लोकगीतांच्या माध्यमातून प्रबोधन करुन जनजागृती करण्यात आली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडे, महाराष्ट्र गीत, रक्तदान, नेत्रदान, देहदान, बेटी बचाव बेटी पढाव, झाडे लावा झाडे जगवा, पाणी अडवा पाणी वाचवा, आधुनिक तंत्रज्ञान, आरोग्य, कृषी, विज्ञान, अनिष्ठ रुढी परंपरा व अंधश्रध्दा निर्मूलन या विषयांचा समावेश होता.