लामजना-लातूर मार्गावर कार- मोटरसायकलचा भीषण अपघात; तीन तरुणांचा मृत्यू लातूर जिल्ह्यातील लामजना-लातूर मार्गावर रविवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. निलंगा तालुक्यातील सरवडी गावातील सोमनाथ दयानंद हिप्परगे (वय 22), अभिजित शाहूराज इंगळे (वय 23) आणि दिंगबर दत्ता इंगळे (वय 27, रा. सरवडी) हे तिघेही आपल्या मोटारसायकलवरून गावाकडे जात असताना ही दुर्दैवी घटना घडली.