सुदर्शन न्यूज टीव्हीने पार्क हॉटेल, दिल्ली येथे 4 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते'आयुष कॉन्क्लेव्ह' कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.जगभरात आयुर्वेद आरोग्य आणि जीवनशैलीचा आधार बनत आहे. सामान्य जनतेच्या वाढत्या आवडी आणि श्रद्धेवरून हे स्पष्ट होते की नैसर्गिक आणि समग्र उपचार पद्धतींचा अवलंब करून लोक अधिक जागरूक होत आहेत.असे मत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले.