गडचिरोली, दि. ०१ सप्टेंबर २०२५ :माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. श्री. अशोकजी नेते यांनी गणेशोत्सव व जेष्ठा गौरी( महालक्ष्मी) च्या निमित्ताने गडचिरोली व चामोर्शी येथील विविध ठिकाणी जाऊन गणपती बाप्पा तसेच ज्येष्ठा गौरी (महालक्ष्मी) यांचे मनोभावे पूजन-अर्चन करून दर्शन घेतले. श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्मिकतेने भरलेल्या या भक्तीमय वातावरणात मा.खा. डॉ. नेते यांनी गणपती बाप्पा व महालक्ष्मी चरणी प्रार्थना केली व समाजाच्या सुख-समृद्धीची मंगलकामना व्यक्त केल