कोपरी गाव येथे अतीधोकादायक घरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे मोडकळीस आलेले घर कधी पडेल याची शाश्वती नाही. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेविका मालती पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. मालती पाटील यांनी देखील महापालिकेकडे पाठपुरवठा केला होता. मात्र आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 1च्या सुमारास महापालिकेकडून सदर घर पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यावर मालती पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.