घनसावंगी तालुक्यातील खडका गावात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी आमदार हिकमत दादा उढाण यांनी भेट दिली. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व झालेल्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करा असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.यावेळी तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी शेतकरी उपस्थित होते.