दि.24 आंबाटोली घोटी येथे सायं.6 वाजेच्या सुमारास फिर्यादी माणिक नान्हे हा घराच्या समोर उभा असताना महिला आरोपी वय 60 वर्ष ही फिर्यादीला पाहून विनाकारण शिवीगाळ करू लागली. तेव्हा फिर्यादीने तू कशाला विनाकारण शिवीगाळ करतेस असे हटकले असता,आरोपी काशीराम बावणे यांनी आपल्या हातात काठी घेऊन आला व फिर्यादीच्या डोक्यावर डाव्या बाजूला लाकडी काठीने मारून दुखापत केल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून दि.24 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सुरू आहे.