सिंचन शाखा तांदुळवाडी अंतर्गत असलेला ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात आज दिनांक ३० ऑगस्ट रोजी १०० टक्के पाणी साठा जमा झालेला आहे.धरणाचे पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास धरणाचा सांडवा केव्हाही प्रवाहीत होऊ शकतो.त्यामुळे नदीला धरणाचे खाली पुर येण्याची शक्यता आहे.नदी नाल्यांना आलेल्या अतिवृष्टीच्या पुरामुळे वित्तहानी /प्राणहानी होऊ शकते.म्हणून नदी काठच्या ३६ गावातील नागरीकांना सतर्क राहणेबाबत तसेच आपली गुरे ढोरे सुरक्षितस्थळी हलविण्याबाबतचा इशारा देण्यात आला आहे.