भाजपाच्या नवनिर्वाचीत पदाधिकार्यांने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्यासाठी संघटन मजबुत करुन सामान्य जनतेचे कामे करावेत, केंद्र व राज्याच्या जनकल्याणकारी योजना ग्रामीण भागातील नागरीकांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे असे अवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आ. नारायण कुचे यांनी गुरुवार दि. 28 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2.30 वाजता केले. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण याच्या सुचनेवरुन कार्यकारिणी केली.