बेलारूस प्रजासत्ताकाचे मुंबईतील वाणिज्यदूत अलियाक्सांड्र मात्सुकोऊ यांनी आज मंगळवारी दुपारी १.३० च्या सुमारास महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी बेलारूस आणि महाराष्ट्र राज्य यांमध्ये प्रांत स्तरावर सहकार्य वाढविण्यासह, कृषी व फलोत्पादन, शिक्षण, मशिनरी, वस्त्रोद्योग, चित्रपट निर्मिती, पर्यटन, संस्कृती आदी क्षेत्रांमध्ये सहकार्य स्थापित करण्याबाबत चर्चा झाली. यावेळी दुतावासाचे कौन्सल काॅन्स्टॅन्टीन पिन्चुक हे देखील उपस्थित होते.