एका 25 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना तालुक्यातील लाख खंडाळा येथे शनिवार ता.30 रोजी उघडकीस आली.गणेश रतन कदम वय 30 वर्षे राहणार लाख खंडाळा असे घटनेतील मयत व्यक्तीचे नाव आहे.या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गणेश याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आल्याने उपस्थितांनी त्याला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.