धाराशिव जिल्ह्यात दि.7 सप्टेंबर ते दि.17 सप्टेंबर या कालावधीत श्री गणेश उत्सव व दिनांक 16 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद हे सण-उत्सव साजरा होणार आहेत.सदर उत्सवाचे अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यात जातीय सलोखा,शांतता,कायदा व सुव्यवस्था अबाधित राहवी या दृष्टीने आज दि.31 ऑगस्ट रोजी दु.1 वा.जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेत जिल्हास्तरीय शांतता समिती बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली.