जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरात शुक्रवार, २२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता बैलपोळा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. वर्षभर शेतीत शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. सकाळपासूनच शेतकरी बांधवांनी आपल्या लाडक्या बैलांना सजवण्यास सुरुवात केली होती.