सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आज शनिवार, 27 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता माढा तालुक्यातील उंदरगाव येथे आले होते. यावेळी गावकऱ्यांनी त्यांना जोरदार विरोध दर्शविला. शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेऊन सदाभाऊ खोत यांनी तातडीने पाहणी दौऱ्यातून माघार घेतली. उंदरगावातील शेतकऱ्यांनी आरोप केला की, त्यांनी निवडणुकीत सदाभाऊ खोत यांना मदत केली होती.