रामपूर येथील बकऱ्या चाराणाऱ्या इसमाचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना पाचोड शेत शिवारात वाघमारे यांचे शेता जवळील नाल्याजवळ दिनांक 26 तारखेला साडेसहा वाजता उघडकीस आली.. प्रभाकर रामराव गुजराती वय 45 वर्ष राहणार रामपूर तालुका आर्वी असे मृतक व्यक्तीचे नाव आहे यासंदर्भात मृतकाचा भाऊ प्रल्हाद रामराव गुजराती वय 48 वर्ष राहणार रामपूर याने खरंगना पोलिसात फिर्याद नोंदवली आहे घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी आज दिली