गुन्हे शाखा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस ठाणे कळमना हद्दीतील शिवशक्ती बार येथे छापा मार कार्यवाही केली असता तेथे परवाना नसतानाही बारमध्ये बार बालिका नृत्य करीत होता आणि त्याच्यावर ग्राहक पैसे उधळत होते. पोलिसांनी छापा मार कार्यवाही करून या ठिकाणाहून रोख रक्कम वाहने मोबाईल फोन वाद्य सामग्री व इतर साहित्य असा एकूण तब्बल 28 लाख 5510 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.