आम्ही पोलीस आहोत. अंबाळा मार्गावर लूटपाटच्या घटना होत आहेत. तेव्हा सोने, चांदीचे दागिने या मार्गावर घालून जाऊ नका. पुडीत बांधून खिशात ठेवा. असे म्हणत स्वतःच पुडी बांधून ती पळवीत अंबाळा येथील पंडित चे काम करणाऱ्या 72 वर्षीय सुरेश दुबे यास दोन अज्ञात इसमांनी 70 हजार रु. चे दागिने पळवून गंडविले. ही घटना रविवार दिनांक 28 सप्टेंबरला सकाळी दहा वाजता च्या दरम्यान अंबाळा वरणावर घडली. याची नोंद दुपारी 1. 47 मिनिटांनी रामटेक पोलीस स्टेशन येथे करण्यात आली.