चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावली शहरातील डॉ आंबेडकर चौकात शनिवार रोजी ३.१० वाजेच्या दरम्यान झालेल्या दोन दुचाकीच्या भिषण धडकेत सावलीतील एका सेवा निवृत्त शिक्षकांचा मृत्यू झाला, तर दुचाकीवरील तिघे जखमी झाले आहेत. मृतकात अशोक प्रल्हाद मेश्राम (६५) यांचा समावेश आहे, तर जखमीत गौरव अशोक मेश्राम (२५) रा.. सावली, ईश्वर सुधाकर बाबनवाडे (३५), साहील महेंद्र बाबनवाडे (२१) रा. सिंदोळा यांचा समावेश आहे.