चिपळूण शहरातील रावतळे मतेवाडी येथे ३० सप्टेंबर २००० पासून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करुन राहणाऱ्या दोन बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. रुखसाना मंडल आणि आलमगीर मंडल अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. १७ एप्रिलला दुपारी तीन वाजता चिपळूण पोलिसांनी ही कारवाई केली आहे.