आज रविवार दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी दुपारी १२ च्या सुमारास बोरीवली पश्चिम येथे मल्याळी समाजाम यांच्यातर्फे ओणम २०२५ उत्साहात साजरा करण्यात आला. हा सोहळा व्ही. के. कृष्णा मेनन शाळा, एमएचबी कॉलनी येथे अतिशय उत्साहात पार पडला. याप्रसंगी बोरीवली विधानसभा येथील स्थानिक भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय उपाध्याय, सिमी नायर, भाजप पदाधिकारी उपस्थित होते. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व आयोजक व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, असे देखील आमदार उपाध्याय यांनी म्हटले.