देवळी-पुलगाव मतदार संघातील मोझरी शेकापूर गावात, साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त आज 21 ऑगस्ट रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला देवळी-पुलगावचे आमदार राजेश बकाने यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते विविध मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला असे सायंकाळी सहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.