पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत येत असलेल्या वडोदा येथे गुप्त माहितीच्या आधारे नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने धाड टाकून गांजा सह 1 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना घडली. याबाबत चे वृत्त असे की वडोदा येथे गांजा विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यावरून धाड टाकून गांजा सह 1 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.