चिपळूण शहरातील मार्कंडी येथून गुरुवारी दुपारी दोन वाजता दोघा बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महंमद हसन अली व आसाद कामरू जवान सिरीना अशी या दोघांची नावे आहेत. चिपळूण शहरातील मार्कंडी परकर चाळीसमोरील सलीम मेमन यांच्या इमारतीत ते राहत असल्याचे निदर्शनास आले.