मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी गजाआड नाशिक │ प्रतिनिधी मुंबईनाका पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या सराईत आरोपी गणेश रमेश पाटील (२१, रा. बिडीकामगार नगर) याला अटक केली. ११ ऑगस्ट रोजी आर.डी. सर्कल परिसरात नागरिकाचा मोबाईल हिसकावल्याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला होता. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला सापळा रचून पकडण्यात आले. आरोपीकडून तीन मोबाईल व पल्सर मोटारसायकल मिळाली