छत्रपती संभाजीनगर: आई बाहेर गेली असल्याने वडिलांना चहा करून दिल्यानंतर भाऊ,मैत्रिणीसह जिमला गेलेल्या २० वर्षीय मुलगी जिममध्ये अचानक चक्कर येऊन पडली.हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना हृदयविकाराचा झटका येऊन मुलीचा मृत्यू झाला. ही घटना बीड बायपास परिसरात गुरुवारी सायंकाळी घडली. एकुलती एक मुलगी गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.