उदगीर डेअरीचा विषय एन.डी.डी.बी. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळच्या मराठवाडा–विदर्भ डेअरी विकास आढावा बैठकीत सविस्तर चर्चेला घेण्यात आला.दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.बैठकीदरम्यान नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना उदगीर डेअरीच्या पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने हाती घेऊन ती विद्यमान डेअरी क्लस्टर योजनेत समाविष्ट करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.या बैठकीत सचिव रामास्वामी यांनी दूध डेअरी चालू करण्यासाठीची माहिती दिली