तालुक्यातील सावळी दातुरा येथे 28 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास एका महिलेला तिच्याच पतीने मारहाण केल्याची घटना घडली. फिर्यादी 40 वर्षीय महिला घरी असताना, तिचा पती आरोपी मोहन तुकाराम धोटे (वय 45) हा दारूच्या नशेत घरी आला. त्याने फिर्यादीला जेवण देण्यास सांगितले. त्यावर फिर्यादीने उशिरा घरी परतल्याबद्दल व दारू पिऊन येण्याबाबत तक्रार केली. या कारणावरून आरोपीने संतापून पत्नीला शिवीगाळ केली व घरातील लाकडी काठीने डोक्यावर, डाव्या पायावर व कंबरेवर मारहाण केली. या हल्ल्यात फिर्याद